7. आरक्षण व्यवस्थेत काय सुधार व्हावे असं मला वाटतं? आजच्या आरक्षण व्यवस्थेमध्ये प्रचंड सुधार व्हायची गरज आहे असं मला वाटतं. सुधार क्र. ०१ -आरक्षण ही मुळात Disadvantaged Setup मधून बाहेर पडण्यासाठी मिळालेली विशेष संधी/मदत/सवलत आहे. पण आज मुळात आरक्षण व्यवस्थेला तिचा उद्देश गाठायला लागणाऱ्या पुरक व्यवस्था थातूरमातूर आहेत. -कसं हे जाणून घेण्यासाठी जरा बाहेर बघूयात! -अनेकांचा गैरसमज असतो की बाहेरच्या प्रगत देशांत आरक्षण नाही, हा गैरसमज आहे. -Racial Integration/Liberalism च्या नावानं तीथे Predominantly Black Colleges जिथे पुर्वी फक्त आफ्रिकन अमेरीकन शिकायचे तिथे गोऱ्या लोकांना प्रवेश राखिव असतात. -मोठमोठ्या Ivy League College/Universities च्या प्रवेश प्रक्रियेत सुद्धा कीती टक्के People of Colour आणि Other Gender वाल्यांना प्रवेश द्यायचे याचं गुणोत्तर ठरलेलं आहे! -हे आरक्षणच झालं! -जसं आपल्याकडे जातीची अस्मिता तिखट टोकदार आहे तशीच तिकडे वंशाची सुद्धा आहेच आणि institutional/Individual Racism चे प्रकार तिथे सुद्धा होतातच पण तिकडे आरक्षणाचा मुद्दा पेटत नाही कारण तिथे संधींची उपलब्धता अमाप आहे! -त्यामुळे आपल्या आरक्षण व्यवस्थेसाठी पहीला पुरक सुधार ‘उत्तम रोजगार आणि गुणवत्तापुर्ण शिक्षणाच्या संधी वाढवणं’ उद्याचा भागात- आरक्षण व्यवस्थेतीस सुधार क्र. ०२ "आरक्षण आणि त्याचे Second Generation Beneficiary यांबाबत सुधार" क्रमशः -ईशान गणपुले. (संगमनेर)
0 Comments
काल आरक्षण विषयात “आरक्षण म्हणजे काय?”, “आरक्षण नक्की का हवं?”, “आरक्षणाचे निकष मला पटतात का?”, “आरक्षणामुळे गुणवत्तेवर परीणाम होतो का?” आणि “आरक्षण असावं की नसावं?” याविषयावर माझं आकलन मी मांडलं. आज त्यातून पुढे चर्चेत येणारे प्रश्न 6. भारतीय आरक्षण व्यवस्थेचं failure काय?
उद्याच्या भागात :- 7. आरक्षण व्यवस्थेत काय सुधार व्हावे असं मला वाटतं? 8. जातीनीहाय आरक्षण जातीअंतामध्ये अडथळा आहे का? 9. आरक्षण हा मुलभूत अधिकार असु शकतो का? क्रमशः - ईशान गणपुले. (संगमनेर) |
Archives
January 2019
Categories
All
|