7. आरक्षण व्यवस्थेत काय सुधार व्हावे असं मला वाटतं? आजच्या आरक्षण व्यवस्थेमध्ये प्रचंड सुधार व्हायची गरज आहे असं मला वाटतं. सुधार क्र. ०१ -आरक्षण ही मुळात Disadvantaged Setup मधून बाहेर पडण्यासाठी मिळालेली विशेष संधी/मदत/सवलत आहे. पण आज मुळात आरक्षण व्यवस्थेला तिचा उद्देश गाठायला लागणाऱ्या पुरक व्यवस्था थातूरमातूर आहेत. -कसं हे जाणून घेण्यासाठी जरा बाहेर बघूयात! -अनेकांचा गैरसमज असतो की बाहेरच्या प्रगत देशांत आरक्षण नाही, हा गैरसमज आहे. -Racial Integration/Liberalism च्या नावानं तीथे Predominantly Black Colleges जिथे पुर्वी फक्त आफ्रिकन अमेरीकन शिकायचे तिथे गोऱ्या लोकांना प्रवेश राखिव असतात. -मोठमोठ्या Ivy League College/Universities च्या प्रवेश प्रक्रियेत सुद्धा कीती टक्के People of Colour आणि Other Gender वाल्यांना प्रवेश द्यायचे याचं गुणोत्तर ठरलेलं आहे! -हे आरक्षणच झालं! -जसं आपल्याकडे जातीची अस्मिता तिखट टोकदार आहे तशीच तिकडे वंशाची सुद्धा आहेच आणि institutional/Individual Racism चे प्रकार तिथे सुद्धा होतातच पण तिकडे आरक्षणाचा मुद्दा पेटत नाही कारण तिथे संधींची उपलब्धता अमाप आहे! -त्यामुळे आपल्या आरक्षण व्यवस्थेसाठी पहीला पुरक सुधार ‘उत्तम रोजगार आणि गुणवत्तापुर्ण शिक्षणाच्या संधी वाढवणं’ उद्याचा भागात- आरक्षण व्यवस्थेतीस सुधार क्र. ०२ "आरक्षण आणि त्याचे Second Generation Beneficiary यांबाबत सुधार" क्रमशः -ईशान गणपुले. (संगमनेर)
0 Comments
Leave a Reply. |
Archives
January 2019
Categories
All
|